Breaking : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल, समोर आली धक्कादायक माहिती

सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्याबद्दल एक मोठी बातमी आली आहे. त्यांनी प्रवचना दरम्यान एका धर्माविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटलेत.

Ahmednagarlive24 office
Published:
sarala bet

सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्याबद्दल एक मोठी बातमी आली आहे. त्यांनी प्रवचना दरम्यान एका धर्माविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटलेत.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या पंचाळे गावात त्यांचे प्रवचन होते. त्यावेळी त्यांनी एका धर्माविषयी एक वक्तव्य केले होते.

त्यांच्या या वक्तव्याने छत्रपती संभाजी नगरच्या वैजापूर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.रात्री आठच्या दरम्यान जमाव जमा तेथील एका चौकात जमा झाला होता.

तेथे जमावाने घोषणाबाजी करत टायरही जाळले. दरम्यान या प्रकरणी रामगिरी महाराजांच्या विरोधात वैजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर जमाव शांत झाला अशी माहिती समजली आहे.

दरम्यान या घटनेनंतर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नका अशा सूचनाही केल्यात. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यात जमावबंदी जाहीर केली असून 16 ऑगस्ट (रात्री १२) ते 19 ऑगस्टपर्यंत जमावबंदी राहील असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान आता हिंदू जन आक्रोश मोर्चाचे देखील आयोजन वैजापुरात केले गेले आहे. पोलिसांनी सगळीच खबरदारी घेतली असून अफवा पसरवणारे, प्रक्षोभक मेसेज पाठवू नयेत असे आवाहन केले आहे. महंत रामगिरी यांच्या प्रवचनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप एका धर्माच्या काही समाजाने केला.

या विधानामुळे भावना दुखावल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नाशिकच्या येवला व मनमाड शहरात देखील याचे पडसाद उमटले व तेथेही तणावात्मक स्थिती निर्माण झाली होती. महंत रामगिरी महाराज यांच्यावर नाशिकच्या येवला शहर पोलिस स्थानकाही गुन्हा दाखल झाल्याची माहिती समजली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe