ब्रेकिंग : संगमनेरमधील वादग्रस्त विधान प्रकरण नव्या वळणावर ; बाळासाहेब थोरात यांच्या कन्येवर गुन्हा दाखल !

Ahmednagarlive24 office
Published:

Sangamner Politics News : संगमनेर मधील वादग्रस्त विधान प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले आहे. या वादग्रस्त प्रकरणात आज पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे या वादग्रस्त विधान प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले असून पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे.

यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या वादग्रस्त विधान प्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. वाहनांचे नुकसान करून विखे समर्थकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. बाळासाहेब थोरातांच्या बंधुंसह निकटवर्ती कार्यकर्त्यांवर हा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती हाती आली आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 109 सह विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल झालाय. दुसऱ्या प्रकरणात आचासंहितेत आंदोलन केल्याने आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला आहे. थोरात, तांबेसह मविआचे एक खासदार आणि दोन उमेदवारांसह अनेक नेत्यांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. खरे तर सुजय विखे पाटील यांच्या जाहीर सभेत वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केले होते.

या विधानानंतर संपूर्ण राज्यभर याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. याच विधानाच्या विरोधात डॉक्टर जयश्री थोरात यांनी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं. दरम्यान या आंदोलनात सहभागी असणाऱ्या पन्नासहून अधिक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे यासह 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आचारसंहिता भंग करत जमावबंदी आदेशाचा उल्लंघन केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जयश्री थोरात पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी, संगमनेर शहर पोलिस ठाण्यावर महिलांसह मोर्चा काढलाय. या प्रकरणात सर्वसामान्य महिलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने पोलिसांनी सर्वप्रथम मला अटक करावी असे जयश्री ताईंनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe