शॉर्टसर्किटमुळे सव्वा एकर ऊस जळून खाक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे ढोरजळगाव रोड लगत असलेला चंद्रकांत गाढे यांच्या उसाला लाईट च्या शॉर्टसर्किट मुळे आग लागून जवळपास सव्वा एकर ऊस जळून खाक झाला आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की, उसाच्या शेतात महावितरणचे लाईटचे खांब असून या खांबावरील विद्युत वाहक तार तुटून खाली पडुन शॉर्टसर्किट होऊन त्याद्वारे उसाला आग लागली.

सदर आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केला परंतु आगीचे स्वरुप वाढत गेल्याने ग्रामस्थ देखील हतबल झाले.ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याहुन अग्निशमन बंब येई पर्यंत उस पूर्णपणे जळून गेला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment