अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- दुचाकी तसेच चारचाकी पेटवून देण्याच्या घटना पुण्यात घडलेल्या याआधी आपण आजवर ऐकल्या असतील. मात्र अशीच काहीशी घटना आता नगर जिल्ह्यात देखील घडली आहे.(Shrigonda News)
जिल्हयातील श्रीगोंदा येथे हे जळीतकांड घडले आहे. यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा शहरातील सावरकर चौक आणि पंचायत समितीच्या परिसरातील नागरी वस्ती
मध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी चार दुचाकी गाड्या पेटवून दिल्याने शहरात सकाळी एकच खळबळ उडाली. दरम्यान या दुचाकी गाड्या योनी पेटवून दिल्या? का पेटवल्या? याबाबत उलट सुलट चर्चा सरु आहे.
या दुचाकींमध्ये एका पोलीस कर्मचार्यांच्या दुचाकीचा देखील समावेश आहे. आता नेमके रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. नेमके कोणी हे कृत्य केले याचा तपास पोलीसांनी केला तर पुढील अनर्थ टळणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम