बस – दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-बस व दुचाकीच्या धडकेत एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान हि घटना नगर कल्याण रोड वरील नेप्ती नाक्याजवळील सीना नदी पात्रा जवळ घडली आहे.

धनंजय बोंबले (रा.श्री स्वामी समर्थ केंद्रा जवळ दाढ. बु. राहता) असे जखमी युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,

धनंजय बोंबले हा युवक नगर-कल्याण रस्त्यावरून नगर शहरात येण्यासाठी निघाला असताना नेप्ती नाक्याजवळील सीना नदी पात्रा जवळ असलेल्या एका खड्यात त्याची दुचाकी आदळली, व दुचाकी समोरून येणाऱ्या बस वर धडकली.

या अपघातामुळे संबंधित युवक रक्ताच्या थारोळ्यात पडला. हे पाहताच परिसरातील दोघांनी या युवकास सरकारी रुग्णालयात दाखल केले. दुपारी अडीचच्या दरम्यान ही घटना घडली असून युवकाचे प्रकृती चिंताजनक आहे.

नगर कल्याण रोड वरील रस्ता अत्यंत दयनीय असून सीना नदी पातळीवरील पुलावर मोठे खड्डे पडले आहेत पण याबाबत कोणीही दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment