हमीभावापेक्षा कमी दराने मका खरेदी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- राज्य शासनाने जूनअखेर १७६० व जूननंतर १८५० रुपये क्विंटल असा हमीभाव जाहीर केला असताना श्रीरामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत एप्रिलपासून हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांकडून मका खरेदी झाल्याचे समोर आले.

फरकाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष अनिल औताडे,

युवराज जगताप, शरद पवार, कडू पवार, नारायण पवार, संदीप उघडे, मनोज औताडे, बाळासाहेब कदम आदींनी बाजार समितीचे सचिव किशोर काळे यांना शनिवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,

शासनाने मक्यासाठी हमीभाव जाहीर केलेला असताना बाजार समितीमध्ये कमी भावाने खरेदी झाली. सुमारे २ हजार क्विंटल मका ३६० ते ४५० रुपये कमी दराने खरेदी करण्यात आला. आहे.

बाजार समीती कायदा १९६३ चे कलम ३४ च नियम ९४ ड प्रमाणे बाजार समितीच्या आवारात हमीभावापेक्षा कमी भावात व्यवहार न होऊ देण्याची जबाबदारी आपणावर आहे.

त्यामुळे या फरकाची रक्कम अदा करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. एप्रिल मध्ये २०३ क्विंटल सरासरी १३१० रुपये भावाने,

मे महिन्यात ८०५ क्विंटल सरासरी १२५० रुपये भावाने, जून महिन्यात ९८३ क्विंटल ११०० रुपये सरासरी दराने खरेदी करण्यात आली. सुमारे ३६० रुपये ते ४५० रुपये कमी दराने मका विक्री करण्यात आली असल्याचा शेतकरी संघटनेचा दावा आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment