साडेपाच लाख रूपये किमतीची गांजाची झाडे जप्त! ‘या’ तालुक्यातील घटना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-सध्या देशभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे पोलिस व आरोग्य यंत्रणा कोरोनाला आटोक्यात आणन्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत.

तर काहीजण याच संधीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायाच्या माध्यमातून माया गोळा करण्याचे काम करत आहेत. असाच प्रकार श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण परिसरात घडला.

येथील एका शेतातून पोलिसांनी तब्बल साडे पाच लाख रूपये किमतीची ११० गांज्यांची झाडे जप्त केली आहेत. याप्रकरणी एकजण ताब्यात घेतला आहे.

याबाबत सविस्तर असे की,  श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदाराने तालुक्यातील मांडवगण शिवारातील रामदास गेणु रायकर यांच्या शेतात मोठ्या संख्येने गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याची माहिती दिली.

या माहितीच्याआधारे पोनि. ढिकले यांनी याबाबतची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनी दिलीप तेजनकर,कृषीअधिकारी पद्मनाभ म्हस्के यांना देवून मांडवगण शिवारातील त्या ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले.

संबंधित अधिकाऱ्यांनी शेतात छापा टाकला असता रामदास गेणु रायकर याने त्याच्या शेतात गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याचे दिसून आले.

संपूर्ण शेताची झडती घेतली असता शेतात तब्बल ५  लाख ४० हजार रूपये किमतीचे सुमारे ११० झाडे आढळून आली.त्यांचे वजन केले असता ते ५५  किलो इतके भरले.

सर्व मुद्देमाल पंचनामा करुन जप्त करून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात रामदास गेणु रायकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe