कुकडी कॅनॉल मध्ये सापडलेला मृतदेह

Published on -

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  पारनेर तालुक्यातील पाडळी आळे येथील डेरेमळा कुकडी कॅनलमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत परिसरातील स्थानिकांनी तात्काळ पारनेर पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली.

त्यानुसार पोलिसांनी संबंधीत व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान याबाबत समजलेली माहिती अशी,

सकाळच्या सुमारास बाळासाहेब बबन गुजर यांना हा मृतदेह कुकडी कॅनॉल मध्ये आढळून आला. त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले,

पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला. आढळून आलेल्या मृतदेहाबाबत पोलिसांनी सांगितले, हा मृतदेह 30 वर्षीय पुरुष जातीचा आहे.

हा मृतदेह नेमका कोणाचा याबाबत पोलीस तपास करत आहेत. मात्र यामागे काही घातपात आहे का हा देखील संशय व्यक्त होत आहे.

याबाबत पारनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल डी ए उजगरे करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!