पोलीस गेला वाहून; पण ‘ते’ चार जण तिथे का गेले होते?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरण परिसरातील रूईचोंढा धबधब्याजवळून गणेश दहिफळे हा रेल्वे पोलिस गुरूवारी वाहून गेला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार ते तेथील मळगंगा देवीच्या दर्शनासाठी आले होते.

पोलिस प्रशासनाने बंदी घातलेली असताना रेल्वे पोलिसांनी ती झुगारून रूईचोंढा परिसरात प्रवेश केला. पोलिस नाईक यू. एल. काेंंगे, पोलिस शिपाई ए. एम. मुठे, पोलिस शिपाई

जे. एस. शेख (बक्कल नंबर २८७), पोलिस शिपाई जी. ए. दहिफळे (बक्कल नंबर ४६५) हे पोलिस पर्यटनासाठी आले होते. धबधब्याजवळ सर्वांनी पोहण्यास सुरूवात केली.

धबधब्याखालील भागाची खोली किती आहे याचा कोणीही अंदाज त्यांनी घेतलेला नव्हता. हा भाग अतिशय खोल असून तेथे रांजणखळग्यांप्रमाणे नैसर्गिक आकार तयार झालेे आहेत.

पोेहता येत नसलेल्या गणेश दहिफळे याने पाण्यात प्रवेश केल्यानंतर तो त्यात बुडाला असावा. एखाद्या कपारीत अडकून बसला असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

पारनेरच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला याबाबत तातडीने कळविण्यात आले. त्यानंतर पथकाने तेथे धाव घेऊन शोध मोहीम सुरू केली आहे.

मात्र, अंधार पडल्याने आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पेच निर्माण झाला आहे. रात्र होताच शोध कार्य थांबविण्यात आले असून उद्या सकाळी शोध कार्य पुन्हा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

सध्या धरण क्षेत्र आणि निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनास बंदी आहे. तरीही हे पोलीस तेथे का गेले होते, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment