पिस्तुलाचा धाक दाखवून काउंटरमधील रोकड लुटली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-नेवासा-शेवगाव रोडवरील शेवगाव परिसरात असलेल्या भैरवनाथ कॉटन इंडस्ट्रीजमध्ये कर्मचारी नंदकिशोर श्रीधर वाघमारे, रा. मिरी रोड, शेवगाव हे इंडस्टीजमध्ये जेवण करत असताना ७ जण जमाव जमवुन यांनी इंडस्ट्रीजमध्ये जाण्यास अटकाव केला असता जातीवाचक शिवीगाळ करून खाली पाडुन खिशातील ५ हजार रुपये काढून घेतले.

पिस्तुल दाखवुन चाकू लावून मारण्याची धमकी दिली, आरोपींनी भैरवनाथ इंडस्ट्रीज कार्यालयात घुसुन येथील काउंटरमधील २५ हजाराची रोकड चोरून नेली व जिवे मारण्याची धमकी दिली.

नंदकिशोर श्रीधर वाघमारे यांच्या फिर्यादीवरून आरोपी बाळासाहेब दत्तात्रय अकोलकर, अनिकेत बाळासाहेब अकोलकर, रा. करंजी, ता.पाथर्डी, महादेव माणिक दानवे, रा. शेवगाव, विक्रम भाऊराव उगले, रा. आखतवाडे,

महादेव दानवे, रा. घाटदेवळगाव, ता. आष्टी व इतर दोन अशा ७ जणांविरुद्ध शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शेवगाव विभागाचे डिवायएमपो मुंडे हे पुढील तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe