अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-मोहंमद पैगंबर जयंती निमित्त फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने विळद घाट येथील मातोश्री वृध्दाश्रमात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले.
या शिबीरात वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे म्हणाले की, मोहंमद पैगंबरांनी माणुसकीची शिकवण दिली.
वृध्दाश्रमात असलेले ज्येष्ठ नागरिक आपल्या समाजातील एक घटक असून, त्यांचे नेत्रदोष दूर करण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले.
सातत्याने गरजू घटकातील दृष्टीदोष असलेल्या रुग्णांसाठी फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने शिबीर घेतले जात आहे. महापुरुषांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी करण्याचा फाऊंडेशनचा पायंडा असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबीरात 48 ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर 28 गरजूंची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहे. डॉ. राहुल बोडखे यांनी शिबीरार्थींची नेत्र तपासणी केली.
तर 16 गरजूंना मोफत नंबरचे चष्मे उपलब्ध करुन देण्यात आले. यावेळी मिश्रीलाल पटवा, राहुल बोडखे, भूषण कनसुळे, रामदास माने, वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक दिलीप चोरडीया आदी उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलचे सहकार्य लाभले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved