केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत द्यावी – मंत्री बाळासाहेब थोरात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  यंदा मान्सूनने व परतीच्या पावसाने मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही बसलेला आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतातील उभी पिकंही वाया गेली असुन या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहीती महुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवेल पण केंद्र सरकार नेत्यासाठी भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

केंद्र सरकारने राज्याला भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे व आतापर्यंतचा अनुभव पाहता केंद्राकडून तुटपुंजी मदतच केली गेली आहे. आता तर राज्य सरकार कोरोना संकटामुळे मोठ्या आर्थिक अडचणी आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करुन राज्याला जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न करतील असेही थोरात म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment