अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या बळींचे ‘शतक’ !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात करोना उपचारादरम्यान आतापर्यंत 100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली.गेल्या सहा महिन्यांपासून करोनाविरुद्ध प्रशासन लढा देत आहे.

त्यास चांगले यश आलेले असले तरी उपचारादरम्यान आतापर्यंत 100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यापासून जिल्ह्यात करोना संसर्ग वेगाने वाढला. त्यातच मृत्यूचा आकडा देखील वाढला आहे.

सरासरी चार ते सहा मृत्यू होत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. असे असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 69 टक्क्यांपर्यंत आहे. जिल्ह्यात 12 मार्चला पहिला करोना संसर्ग झालेला रुग्ण आढळला.

जिल्हा प्रशासनाने त्यावर उपाययोजना राबवित परिस्थिती आटोक्यात ठेवली. त्यावेळी जिल्हा प्रशासनाला लॉकडाऊनची साथ मिळाली. परंतु लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली.

केंद्र व राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉकची भूमिका घेतली. अहमदनगर जिल्हा प्रशासनाने त्यानुसार अंमलबजावणी केली. काही नियम व अटीचे निर्बंध घालून संचारबंदी कायम ठेवून व्यवहार सुरू केले.

त्यातच वातावरणातील बदल करोना संसर्गाला पूरक ठरला आणि गेल्या महिन्याभरापासून रुग्णसंख्येत वाढ झाली. अहमदनगर शहरात दररोज सरासरी दोनशे रुग्ण आढळून येत आहेत.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील परिस्थिती वेगळी नाही. सौम्य, अतिसौम्य आणि गंभीर, असे तीन भाग करून करोना रुग्णांवर प्रशासनाने उपचार सुरू केले आहेत.

तरी देखील रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाहीत. त्यातच रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने करोना संसर्ग रोखण्यासाठी अधिकच कडक उपयायोजना कराव्या लागणार आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment