चक्क महसूल मंत्र्यांच्या गावातून कृषी विधयेकाला समर्थन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-कृषी विधेयकावरून देशभर वातावरण चांगलेच तापले आहे. अद्यापही तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरु ठेवण्यात आले आहे.

याचाच निषेध म्हणून काँग्रेसने देखील नगर जिल्ह्यात निदर्शने केली होती. मात्र आता चक्क महसूलमंत्र्यांच्या तालुक्यातूनच या विधेयकाला समर्थन करण्यात आले आहे.

केंद्रसरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यास ग्रामपंचायत सभेत मंजूर करणारी संगमनेर तालुक्यातील निमोण येथील ग्रामपंचायत नगर जिल्ह्यात पहिली ठरली आहे.

निमोण येथील ग्रामपंचायतने केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी सुधारणा कायद्यास मंजुरी दिली आहे. निमोण ग्रामपंचायतची नुकतीच प्रभारी सरपंच दगडू मुरलीधर घुगे या अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली.

या सभेत ग्रामपंचायत सदस्य अशोक कराड यांनी कृषी कायद्यास समर्थन देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावर सभेत चर्चा व विचारविनिमय करण्यात आला.

केंद्र सरकारने सादर केलेले कृषी विधेयक कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत यावर सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर कायद्यास समर्थन देणारा ठराव मंजूर करण्यात आला.

ग्रामपंचायत सदस्य अशोक कराड यांनी या ठरावाची सूचना मांडली तर त्यास मुश्ताक सुभेदार यांनी अनुमोदन दिले. नगर जिल्ह्यात कायद्यास समर्थन देणारा ठराव मंजूर करणारी ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe