अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना मध्ये वाढ होत आहे. तसेच यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.
यातच बहुतांश वेळा महिलांवरील होणारे अत्याचाराच्या घटना त्यांच्या परिचित व्यक्तींकडूनच झालेल्या आढळून आल्या आहेत.
यातच जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील देवगाव येथील एक महिला घरासमोर असताना तिलाच गुलाब शेख नावाच्या व्यक्तीने मारहाण केल्याची घटना घडली आहे.
तसेच शेख यांनी पीडित महिलेशी असभ्य वर्तन केले आहे. दरम्यान पीडित महिलेच्या फिर्यादीवरून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिलेने दिले फिर्यादी सांगितले की, सकाळी घरासमोर असताना गुलाब शेखनूर शेख यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केले.
तसेच शेख यांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून काठीने मांडीवर तसेच डोक्यात मारले व शिवीगाळ करून तो निघून गेला. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुलाब शेखनूर शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved