खते, कीटकनाशकांचा अनधिकृत साठा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Published on -

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथे विनापरवाना कीटकनाशकांची साठवणूक केल्याबद्दल सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्राचा चालक विजय रघुनाथ पवार (जलालपूर ता. कर्जत) याच्या विरोधात कृषी विभागाने कारवाई केली.

शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खत नियंत्रण कायदा, कीटकनाशक कायदा व अत्यावश्यक वस्तू कायदा अंतर्गत तरतुदींचा भंग केल्याने कारवाई करण्यात आली.

संबंधित कृषी सेवा केंद्र हे कोणत्याही परवान्याशिवाय कार्यरत होते. या कृषी सेवा केंद्राची तपासणी, पंचनामा व सील करण्याची कारवाई तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के व डॉ. राम जगताप यांच्यासह अमजद तांबोळी,

किसन सांगळे व सहायक कृषी अधिकारी संदीप बोदगे यांच्या भरारी पथकाने केली. ३.२९ लाखांची खते व.१.२६ लाखांची कीटकनाशके जप्त करण्यात आली आहेत.

याबाबतीत श्रीगोंदे पोलिस ठाण्यात संबंधित विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित करत आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!