Ahmednagar News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय रणधुमाळी आपल्याला राज्यात दिसून येत आहेत. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी देखील जोरात सुरू आहे.
प्रत्येक मतदारसंघांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी तर होतच आहे,परंतु महायुती सरकारच्या माध्यमातून आचारसंहिता लागण्याच्या अगोदर विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका मात्र जोरात सुरू आहे. या सगळ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर बघितले तर मात्र महायुतीमध्ये सगळे काही अलबेल आहे असे मात्र दिसून येत नाही.
आपल्याला माहित आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे भाजपचे बरेच नेते नाराज आहेत व तशा पद्धतीचे जाहीर वक्तव्य देखील भाजप नेत्यांच्या माध्यमातून समोर आल्याचे आपण बघितले. भाजपला अजित पवार नकोसे झाले आहेत का? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
या सगळ्या प्रकरणावर आणखीनच भर पडण्याचे काम झाले ते म्हणजे अहमदनगर व परिसरामध्ये सोमवारी प्रदेश भाजपच्या माध्यमातून काही फ्लेक्स लावण्यात आले व या फ्लेक्स वर सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र होते.
परंतु राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र या फ्लेक्सवर स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटामध्ये अस्वस्थता पसरली असून फलक बाजीतून अजित पवारांना वगळल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भाजपच्या फ्लेक्स वर मुख्यमंत्र्यांना स्थान परंतु अजित दादांना वगळले
प्रदेश भाजपच्या वतीने अहिल्यानगर व परिसरात सोमवारी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर सत्ताधारी महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवेसनेचे मुख्यमंत्री महाताथ शिंदे यांना स्थान दिले, मात्र राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छायाचित्र नसल्याने राष्ट्रवादीच्या गटात अस्वस्थतता पसरली आहे.
विशेष म्हणजे महायुतीत असलेले मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विविध निर्णयांत पवार सहभागी असताना या फलकबाजीतून मात्र पवारांनाच डच्चू मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री पवार यांनी अकोले येथे रविवारी त्यांच्या पक्षाची उमेवादारी जाहीर केली.
याचा अकोलेचे माजी आमदार वैभव पिचड यांनी निषेध नोंदवला. यावरुन आता महायुतीमध्ये निवडणुकीआधीच भाऊबंदकी सुरू झाली आहे.आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दसऱ्यानंतर लागण्याची शक्यता आहे. अद्याप महायुतीतील जागा वाटपाचा तिढा कायम असताना भाजपकडून आचारसंहितेपूर्वीच बॅनरबाजी सुरू झाली आहे.
सोमवारी अहिल्यानगर व परिसरात प्रदेश भाजपकडून महायुतीने विविध घेतलेले निर्णय, कामांबाबत लावण्यात आलेल्या फ्लेक्स्वर महायुतीतील मित्रपक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार (राष्ट्रवादी) यांचे छायाचित्र वगळले आहे.
पवार महायुतीत असताना त्यांचे छायाचित्र या फ्लेक्सवर नाही मात्र महायुतीतील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री शिंदे यांचे छायाचित्र मात्र यावर आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात अस्वस्थता पसरलेली आहे.
दरम्यान, शहरात फ्लेक्स कुणी लावले, कुठे लावले याबाबत मला काहीही कल्पना नाही आणि माहित पण नाही. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिली
कार्यकर्त्यांची मागणी पवारांसोबत निवडणूक नको
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी महायुती एकत्रित विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते. तत्पूर्वी भाजपच्या प्रदेश स्तरावर झालेल्या बैठकीत पदाधिकारी,
कार्यकत्यांनी अजित पवार यांच्यासोबत निवडणूक नको, अशी मागणी केली होती. या मागणीनंतर पक्षांतर्गत बंडखोरी होऊ नये, यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इच्छुकांसाठी मतदान प्रक्रिया राबवली होती.