चायना मांजावर बंदी; या तालुक्यातील नगरपरिषदेनें घेतला निर्णय

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-नवीन वर्षाचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे, यातच आगामी काही दिवसात संक्रांतीचा सण आला आहे. याकाळात चायना मांज्यावरून अनेक अपघात झालेले आहे.

याच पार्शवभूमीवर श्रीरामपूर नगरपरिषदेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सार्वजनिक भावनेचा विचार करुन शहरात चायना मांजा विक्री व साठवणूक तसेच वापर होत असेल तर त्यावर नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे,

अशी माहिती श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे की, सार्वत्रिक भावनेचा विचार करुन चायना मांजा विक्री व वापरावर बंदी घातली आहे,

परंतु सदर बंदी आदेशानंतर देखील श्रीरामपूर शहरात चायना मांजा विक्री व वापर होताना दिसत आहे. चायना मांजामुळे पशुपक्ष, लहान मुले, माणसे जखमी होतात. जीवित व अपघात होण्याच्या घटना घडत आहे.

त्यामुळे पशुपक्ष्यांचे संरक्षणार्थ चायना मांजाची विक्री व वापर करु नये अन्यथा विक्री व साठवणूक करणारे व्यापारी व नागरिकांवर दंडात्मक स्वरुपाची तसेच कायदेशीवर कारवाई केली जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News