अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :-बेलापुर खूर्द येथे शिक्षणासाठी बाहेरगावहुन आलेल्या शाळकरी मुलीचा विनयभंग करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दरम्यान तरुणीचा विनयभंग करणाऱ्यास नागरीकांनी बेदम चोप देवुन बेलापुर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
बाहेरगावहुन शिक्षणासाठी येणाऱ्या एका मुलीची देवळाली प्रवरा येथील मुलाने छेड काढली. मुलीने हा प्रकार काही सामाजिक कार्येकर्त्यांना सांगीतला त्यांनी त्या मुलास शोधुन जाब विचारला तसेच त्याला चांगला धडाही शिकविला.
त्यानंतर नागरीकांनी त्यास बेलापुर पोलीस स्टेशनला आणले तेथे मुलीच्या घरच्यांनी तक्रार न दिल्यामुळे विषय तेथेच संपला. दरम्यान बेलापुर खूर्द व बेलापुर बु!! येथे
बाहेरगावहुन मुली शिक्षणासाठी येत असतात काही मुली बसने येतात तर काही मुली सायकलने येतात. हे रोडरोमिओ नेहमी मुलीच्या जाण्या येण्याच्या मार्गावर उभे राहुन मुलींची छेडछाड करतात.
या घटनांच्या तक्रारी दाखल केल्या जात नसल्याने रोडरोमिओच्या या घटनांना आळा बसविणे गरजेचे होऊ लागले आहे. अशा घटना घडू नये यासाठी या टारगटांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालकाकडून केली जात आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved