आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात नागरिकांना पाण्याची झळ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी इतर बाबींपेक्षा पाणीपुरवठा या महत्त्वाच्या विषयात प्राधान्याने लक्ष घालण्याची गरज आहे. मात्र त्यांचे याकडे पूर्ण दुर्लक्ष झालेले असून ही कर्जतकरांसाठी गंभीर बाब आहे.

जाधव यांच्या दुर्लक्षामुळे कर्जत शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तब्बल सहाव्या दिवशी आज कर्जत शहराला पाणीपुरवठा झाला नाही.

कर्जत शहराला पाणीपुरवठा करणारी योजना झाल्यानंतर पहिल्यांदाच अशी वेळ कर्जतकरांवर आली आहे. मुख्याधिकारी यांनी कारभार सुधारावा अशी मागणी रिजवान मुन्नाभाई पठाण यांनी केली आहे.

सध्या भेडसावत असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी काही प्रतिष्ठान व संघटनांनी मागील दोन-तीन दिवसांपासून कर्जत शहरांमध्ये पाणी वाटपाला सुरुवात केली आहे

कित्येक दिवसानंतर कर्जत शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात टँकरची ये-जा सुरू झाली आहे. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवकांची मुदत संपताच जर नियोजनाचा अभाव यापद्धतीने जाणवत असेल

तर भविष्यात निवडणुका होईपर्यंत कर्जतकरांना अशा संकटांना तोंड द्यावे लागणार का ? हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment