अहमदनगर जिल्ह्यातील या गावचे नागरिक करणार टोलबंदीसाठी आंदोलन !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- नगर-कल्याण महामार्गावर असणाऱ्या ढोकी टोलनाक्यावर पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द ग्रामस्थांची टोलवसुली करून आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

त्यामुळे या टोलवसुलीच्या विरोधात ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी ढोकी टोलनाक्यावर टोल बंद अंदोलन करण्याचा इशारा  दिला आहे. यासंबंधीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांच्यासह तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलेले आहे.

मांडवे खुर्द गाव ते ढोकी टोलनाक्याचे परीघीय अंतर अवघे १९.७३कि.मी आसताना मांडवे खुर्द गावातील सर्व वाहणांकडून टोल आकारणी केली जाते. वास्तविक पाहता मांडवे खुर्द गाव हे टोलनाक्याच्या परीघीय क्षेत्रात येत आसतानाही टोलनाका चालकांच्या मनमानी कारभारामुळे मांडवे खुर्द ग्रामस्थांना नाहक मनस्ताप होत असुन, आर्थिक लुबाडणूक होत आहे.

या विरूध्द मांडवे गावचे उपसरपंच जगदीश पाटील गागरे यांच्या नेतृत्वाखाली दि. ८ फेब्रुवारी रोजी टोल बंद अंदोलन व रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या प्रश्ना संदर्भात टोल प्रशासन व शासनाने योग्य निर्णय घेऊन मांडवे ग्रामस्थांन वर होणारा अन्याय दुर करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!