नगरकरांनो लक्ष द्या; पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- महापालिकेच्या मुळानगर शहर पाणी योजनेच्या पंपींग स्टेशन येथील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी सोमवारी (दि.14) काम सुरू करण्यात येणार आहे.

त्यामुळे सकाळी 11 वाजल्यापासून पाणी उपसा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

सोमवारी स्टेशन रोड, विनायकनगर, आगरकर मळा, बालिकाश्रम रोड, सावेडी उपनगर भागास सकाळी 11 नंतर होऊ घातलेला पाणीपुरवठा होणार नाही. त्याऐवजी या भागास मंगळवारी (दि.15) पाणीपुरवठा होणार आहे.

तर मंगळवारी रोटेशननुसार पाणी वाटप असलेल्या झेंडीगेट, रामचंद्र खुंट, हातमपुरा, रामचंद्र खुंट, कोठला, माळीवाडा, सारसनगर, बुरूडगाव रोड, सावेडी उपनगर भागास बुधवारी (दि.16) पाणी पुरवठा केला जाणार आहे.

बुधवारी पाणी वाटप असलेल्या सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, चितळे रोड, तोफखाना, नालेगाव, कापड बाजार, आनंदी बाजार, स्टेशन रोड, विनायकनगर भागास गुरूवारी (दि.17) पाणी सोडले जाणार असल्याचे मनपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment