नगरकरांनो काळजी घ्या ; जिल्ह्यात एकाच महिन्यात डेंग्यूचे आढळले ‘इतके’ रुग्ण

Published on -

Ahmednagar News : सध्या सर्वत्र पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सर्वत्र गावात वाढले आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून डबके तयार झालेले आहेत. परिणामी नगर शहरासह आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही साथीच्या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जून महिन्यात अवघे ८ रुग्ण सापडले होते. मात्र जुलै महिन्यात तब्बल ३२ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून त्यात सर्वाधिक नगर शहरात ९ रुग्ण आढळले आहे. नुकतीच डेंग्यूची चाचणी करण्यात आल्याने डेंग्यू सदृश्य असे ८२ रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहे.

१ जानेवारी ते २२ जुलैपर्यंत आरोग्य विभागाने ४७७ जणांचे रक्त नमुने घेतले असून त्यापैकी डेंग्यूचे ५८ रुग्ण सापडले आहे. त्यात ३ रुग्ण इतर जिल्ह्याचे आहेत. सर्वाधिक आकडा हा जुलै महिन्यात असून या महिन्यात तब्बल ३२ रुग्ण सापडले आहे. यामुळे जिल्हा आरोग्य विभाग अलर्ट झाला असून तातडीने उपायोजना सुरू केल्या आहेत.

नगर शहरात महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात उपाययोजना सुरू केल्या असून आयुक्त यशवंत डांगे यांनी दर रविवारी एक तास स्वच्छतेला देवून कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन नगरकरांना केले आहे. मात्र गेल्या रविवारी शहरात कोठेही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली नाही. तसेच कोरडा दिवस देखील पाळला गेला नसल्याचे दिसून आले.

१ जानेवारी २०१४ पासून घेण्यात आलेल्या रक्त नमुन्यातून डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत . जानेवारीमध्ये ६, फेब्रुवारीत ३, मार्चमध्ये १, एप्रिलमध्ये ३, मे महिन्यात ५, जुनमध्ये ८ तर जुलै महिन्यात थेट ३२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आता दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे.

त्याचा अर्थात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणवर होतांना दिसत असून नागरिकांसह आरोग्य विभाकडून योग्य पद्धतीने स्वच्छता होत नसल्याचे दिसत आहे.

नगर शहरात स्वच्छतेचे तीन तेराच वाजले आहेत. कचरा रस्त्यावर साठलेला दिसत असून उपनगरात पावसाच्या पाण्यामुळे साठलेले डबके देखील महापालिकेकडून स्वच्छ केली गेली नाहीत. त्यामुळे डास वाढण्याचे प्रमाण वाढले आहे.

मात्र चालू जुलै महिन्यात तब्बल ३२ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून त्यात सर्वाधिक नगर शहरात ९ रुग्ण आढळले आहेत .

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe