अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात तरुणांच्या हाणामाऱ्या ; वादाला राजकीय किनार ?

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : शुक्रवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर दुचाकीला धक्का लागल्याच्या अगदी क्षुल्लक कारणातून दोन तरुणात तुफान हाणामारी झाली. यातील एकजण श्रीगोंदा कारखाण्यावरील तर दुसरा शहरात राहणारा आहे.
यात हे दोघेही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. तर एकाच्या पाठीवर, हातावर, पोटावर गंभीर दुखापत झाली असून, दुसऱ्या तरुणाच्या डोक्याला मार लागला आहे. भरदिवसा एवढ्या किरकोळ कारणातून दोन्ही तरुणांनी एकमेकांवर जीवघेणा हल्ला केला या घटनेने महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या सामान्य विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

श्रीगोंदा शहरात सध्या कायद्याचा धाक अजिबात उरला नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे, दोन दिवसांपूर्वीच महाविद्यालयात एका मुलाचा दुसऱ्या मुलाला धक्का लागल्यामुळे महाविद्यालयासमोरच दोन गटात जबर मारहाण झाली होती.

यात एका गटाकडे रॉड तर दुसऱ्या गटातील तरुणाकडे चाकू असल्याचे अनेकांनी सांगितले. भरदिवसा झालेल्या या जबर मारहाणीमुळे दहशतीचे वातावरण पसरले होते त्यावेळी दोन्ही बाजूकडून कोणतीही तक्रार दाखल न करता ते प्रकरण आपसात मिटवण्यात आले.

या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच परत शुक्रवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास एका नामंकित महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणातून श्रीगोंदा कारखाण्यावरील तरुण व शहरातील तरुण यांच्यात तुफान हाणामारी झाली.

यात दोन्ही तरुण गंभीर झखमी झाले आहेत एका च्या पाठीवर,हातावर, पोटावर गंभीर दुखापत झाली असून दुसऱ्या तरुणाच्या डोक्याला मार लागला आहे भरदिवसा एवढ्या किरकोळ कारणातून दोन्ही तरुणांनी एकमेकांवर जीवघेणा हल्ला केला या घटनेने महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या सामान्य विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस तिथे पोहोचले मात्र पोलिसांसमोर या दोन्ही तरुणांची मारहाण चालू होती त्यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले. दरम्यान या वादाला राजकीय किनार असल्याची नागरिक डबक्या आवाजात चर्चा करत होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe