स्वच्छ सर्वेक्षण : फाइव्हस्टार मानांकन मिळवण्याचा संकल्प

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-  अहमदनगर महानगरपालिकेने केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व राज्य शासनाच्या वसुंधरा अभियानामध्ये भाग घेतलेला आहे. गतवर्षी लोकसहभागामुळे आपण उत्तम कामगिरी केली आहे.

थ्री स्टार मानांकन मिळवले, स्वच्छतेच्या बाबतीत देशात ४० व्या स्थानावर पोहोचलो ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

यापुढे जाऊन या वर्षी आपण आणखी प्रयत्न करून आपल्या शहराला फाइव्ह स्टार मानांकन मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले.

याबाबत मनपा खाते प्रमुखांची नियोजन व आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. त्यात सर्वांना जबाबदारी देण्यात आली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ चे प्रकल्प अधिकारी राहूल अहिरे व सौरभ जाधव यांनी याबाबत सादरीकरण केले.

मानांकनासाठी असलेले विषय सर्वांना विभागून देण्यात आले आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी उत्तमपणे पार पाडावी, जनजागृती तसेच प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करावे, असे आवाहन मायकलवार यांनी यावेळी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News