अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील जिल्हा परिषद शाळा ही तळीरामांचा अड्डा बनला आहे. शाळेच्या पडवीत बसून तळीरामांनी मोकळ्या बाटल्या टाकून दिल्याचे दिसून आल्याने संताप व्यक्त होत आहे.
दारू दुकाने सुरू झाल्याने अवैधरित्या दारू विक्री होत असल्याचे ग्रामीण भागात चित्र आहे. गावठी दारू व देशी, विदेशी दारूचा साठा केला जात आहे.
शाळाबंद असल्यामुळे मद्य शौकिन शाळेच्या पडवीतच शौक पूर्ण करत आहेत या तळीरामांची टोळी चांगलीच बळकट होत असल्याचे चित्र आहे.
कितीही बंद ठेवा परंतु आम्ही आमचे व्यसन पूर्ण करणारच म्हणत तळीरामांकडून गावांमध्ये धुडगूस सुरूच आहे.लोकवर्गणीतून गतकाळात या शाळेच्या इमारतीला रंगरंगोटी करून,
बोलके चित्र काढून शाळेच्या दोन्ही इमारती सुसज्ज केल्या होत्या. दरम्यान, पिंपरणे जिल्हा परिषद शाळा कोरोना मुळे सध्या बंद आहे शाळा बंदचा फायदा घेत ठिकाणी काही तळीरामांनी बैठक मांडत पार्टी केल्याचे चित्र दिसून आले आहे.
दारूच्या बाटल्या, वेफर्स पाकीटांचा खच शाळेच्या खोल्या समोर दिसून आला. बंद शासकीय कार्यालय व शाळांचा वापर तळीराम आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी करीत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved