आ. कानडे यांनी केले ‘असे’ काही ; त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दुधाला दरवाढ मिळावी यासाठी भाजपने आंदोलन केले. म्हणून आंदोलन करणार्‍या भाजपा पदाधिकार्‍यांवर व दूध उत्पादक शेतकर्‍यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी आ. कानडे यांनी केली होती.

परंतु आता भाजप पदाधिकाऱ्यांनी हाच धागा पकडत आ. कानडे यांच्या हस्ते कोव्हिड सेंटरमध्ये समाज कल्याण विभागाच्या वतीने गटई कामगारांच्या टपर्‍यांचे वाटप करण्यात आले त्यावरून तोफ डागली आहे.

आमदारांनीच कायदा-सुव्यवस्थेचा भंग केला असा आरोप करत यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले गेले नाही. शासकीय अधिकारी पदाधिकार्‍यांना जर नियमांचे उल्लंघन करून कार्यक्रम घेण्यास भाग पाडत असतील

तर या बेजबाबदार आमदारांविरुध्द गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी श्रीरामपूर भाजपाच्यावतीने करण्यात आली. सदर कार्यक्रम कोव्हिड सेंटर हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेला असताना

देखील सेंटरच्या लगत घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी लोकप्रतिनिधींच्या समवेत त्यांचे सहकारी बरोबरच समाज कल्याण विभागाचे अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यासह 53 लाभार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी वाटप करण्यात येणार्‍या टपर्‍यांचे सुट्टे भाग हे कोव्हिड सेंटरमधील आवारामध्ये ठेवण्यात आले होते. तेथुनच त्यातील एक टपरी कार्यक्रम स्थळी आणण्यात आली.

त्यामुळे शासकीय अधिकारी पदाधिकार्‍यांना जर नियमांचे उल्लंघन करून कार्यक्रम घेण्यास भाग पाडत असतील तर या बेजबाबदार व निष्क्रिय आमदारांवर गुन्हा

दाखल झालाच पाहिजे अशी मागणी श्रीरामपूर भाजपा तालुका अध्यक्ष सुनील वाणी, अशोकचे संचालक बबन मुठे आदींसह पदाधिकाऱ्यांनी केली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment