अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक ४० बेडचे कोव्हीड सेंटर हे आमदार रोहित पवार यांच्या सृजन संस्थेमार्फत सुरू करण्यात आले आहे.
या कोव्हीड सेंटरचे उद्घाटन दिवंगत डॉ. विलास काकडे यांच्या पत्नी विद्या काकडे व डॉ. रोहित काकडे व कुळधरण येथील दिवंगत डॉ. प्रशांत जगताप यांच्या मातोश्रीच्या हस्ते करण्यात आले. या कोव्हीड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या उद्घाटनप्रसंगी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचेता यादव, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
कर्जत तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.तालुक्यातील विविध ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेत कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात नवीन ४० बीडचे ऑक्सिजन सुविधेसह सुसज्ज असलेले कोव्हीड सेंटर सुरू केले आहे.
ग्रामीण भागामध्ये अशाप्रकारे आधुनिक सेंटर नसल्याने ते आमदार रोहित पवार यांनी सुरू करून सर्व सामान्यांना दिलासा दिला आहे. सुरू करण्यात आलेले हे कोव्हीड सेंटर रुग्णांसाठी गरजेचे असुन आता अत्यावश्यक रुग्णांना ऑक्सिजन सुविधाही पुरवण्यात येईल.
सेंटर सुरू करण्यासाठी सर्व डॉक्टर्स, अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. कोरोना या जीवघेण्या आजारांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे या हेतूने हे सेंटर निर्माण केले आहे.
– रोहित पवार, आमदार
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved