अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :पारनेरचे आ. निलेश लंके यांनी माजी आ. विजयराव औटी यांच्या पारनेरमधील गडाला हादरा दिल्याने एकाच वेळी अनेक बुरुंज ढासळले आहेत.
पारनेरच्या शिवसेनेतील पाच नगरसेवकांनी आज दुपारी बारामतीला जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे पारनेर शहरात राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचे वर्चस्व वाढले असून शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांना मोठा धक्का बसला आहे.
नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार लंके यांचे नेतृत्व स्वीकारले आहे.
दरम्यान पारनेर नगरपंचायतीची पंचवार्षिक मुदत चार महिन्यात संपणार आहे. पारनेर नगरपंचायत यावेळी कोणत्याही परिस्थितीत काबीज करण्यासाठी आ. निलेश लंके यांनी कंबर कसली असून प्रत्येक प्रभागनिहाय नियोजनही सुरू केले असून अनेक जण इच्छुक आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews