आ. आशुतोष काळेंनी दिलेल्या निधीची 20 तारखेला भरभरून मतदान करून परतफेड करा; महानंदाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बापू जाधव यांचे आवाहन

मतदार संघातील मायगाव देवी येथे आमदार काळे यांच्या प्रचारासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती व या बैठकीला महानंदा दूध संघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बापू जाधव हे उपस्थित होते व त्यांनी उपस्थितांना या बैठकीत अनमोल असे मार्गदर्शन केले.

ashutosh kale

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघ हा अनेक दृष्टीने खूप महत्त्वाचा मतदारसंघ असून अहिल्या नगर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर असलेल्या या जिल्ह्याचे राजकीय महत्त्व संपूर्ण जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे.

सध्या या विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार आशुतोष काळे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांना समाजातील विविध घटकांकडून आणि मोठ्या प्रमाणावर अनेक संघटनांच्या माध्यमातून पाठिंबा मिळताना दिसून येत असल्याने त्यांनी प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणावर वेग घेतला आहे.

तसेच कोपरगाव शहर आणि मतदार संघातील ग्रामीण भागामध्ये देखील त्यांनी गाव भेटी आणि प्रचार फेऱ्या यांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे.

याच पद्धतीने मतदार संघातील मायगाव देवी येथे आमदार काळे यांच्या प्रचारासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती व या बैठकीला महानंदा दूध संघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बापू जाधव हे उपस्थित होते व त्यांनी उपस्थितांना या बैठकीत अनमोल असे मार्गदर्शन केले.

आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या निधीची मतदानाने परतफेड करा-महानंदाचे माजी उपाध्यक्ष जाधव यांचे आवाहन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मायगाव देवी येथे महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ बैठकीच्या आयोजन करण्यात आलेले होते.या बैठकीमध्ये महानंदा दूध संघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बापू जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले

व त्यावेळी म्हटले की, तालुक्याच्या पश्चिम भागातील जिव्हाळ्याचा मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आमदार आशुतोष काळे यांनी ते 40 कोटी 51 लाख रुपयांचा निधी आणला

व या निवडणुका संपताच या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे. परंतु त्या अगोदर आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या निधीची परतफेड 20 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भरभरून मतदानातून करून द्या या प्रकारचे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, कोपरगाव मतदार संघ हा अवर्षणग्रस्त असल्यामुळे आपल्याकडे दरवर्षी पाऊस कमी पडतो. नैसर्गिक आपत्तीमुळे आपला मंजूर बंधारा तीन वेळा वाहून गेल्यामुळे हजारो हेक्टर शेतीचे खूप मोठे नुकसान झाले.

यामध्ये मंजूर तसेच चासनळी, हांडेवाडी, धामोरी, मायगाव देवी तसेच कारवाडी व मोर्वीस इत्यादी गावातील शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले होते. भूगर्भातील पाण्याची पातळी देखील मोठ्या प्रमाणावर खालावली होती. परंतु आमदार आशुतोष काळे यांनी मंजूर बंधाऱ्याला 41 कोटी 51 लाख रुपयांचा निधी आणला असून त्यातून आता या बंधाऱ्याची दुरुस्ती होऊन खूप मोठा फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe