दिलासादायक ! पशुपालकांना मिळणार नुकसान भरपाई

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-  देशासह जिल्ह्यात काही दिवसांत बर्ड फ्ल्यूने शिरकाव केला आहे.

जिल्ह्यातील ज्या ठिकाणी मृत कोंबड्यांचा बर्ड फ्ल्यूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या ठिकाणी असणार्‍या बाधित कोंबड्या, अंडी आणि खाद्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

दरम्यान या ठिकाणीच्या पक्षी पालकांसाठी नुकसान भरपाईसाठी म्हणून 5 लाख 36 हजार रुपयांची भरपाई मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद पशूसंवर्धन आणि अर्थ समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत विविध पक्ष्यासोबत कोंबड्या मृत पावलेल्या आहेत. मृत पावलेल्या कोंबड्यांसह अन्य पक्षांचे नमुने पुणेच्या राज्यस्तरीय आणि भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत.

आतापर्यंत पाठविलेल्या 23 नमुन्यांपैकी 5 नमुन्यांचा अहवाल आला असून यातील 3 अहवाल बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह आहेत. तर दोन अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालापैकी चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील 638 कोंबड्या,

सडे (ता. राहुरी) येथील 2 हजार 179 कोंबड्या, शिंदोडी (ता. संगमनेर) येथील 2 हजार 628 कोंबड्या आणि मांडवे (ता. पारनेर) येथील 73 कोंबड्या, अंडी आणि खाद्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News