दिलासादायक! साईबाबांच्या शिर्डीतील गुन्हेगारी मुक्तीकडे वाटचाल

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, दरोडा, चोऱ्या आदी घटनांमध्ये वाढच होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे. दरम्यान वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस प्रशासन देखील सक्रिय झाले आहे.

नुकतेच शिर्डी मधील गुन्हेगारीचा वाढता आलेख रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर उपायोजना केल्या आहेत. यामुळे गुन्हेगारी रोखण्यात यश मिळत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी दिली.

शिर्डी शहर व परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी जनता व पोलीस यांच्यात संवाद निर्माण करून गुन्हेगारी रोखण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू करण्यात आले आहे.

भाविकांना होणारा पाकिटमारीचा त्रास रोखण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना गजाआड करण्यात आले होते. तसेच त्यांच्या सहवासात राहणारे, त्यांना पाठबळ देणारे, त्यांच्याशी संपर्क ठेवणार्‍या लोकांच्या हालचालींवर शिर्डी पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहे. धूमस्टाईल चोरी, लुटमार, पाकीटमारी यांचे प्रमाणदेखील कमी करण्यात यश मिळाले आहे. जनतेनेदेखील गुन्हेगारी रोखण्यासाठी काही माहिती असेल तर ती देण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!