दिलासादायक ! संगमनेर मध्ये कोरोनाबाधितांची आकडेवारी शंभरच्या आत

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- राज्यातील कोविड बाधितांची संख्या झपाट्याने खालावत असतांनाही अहमदनगर जिल्ह्याची कोरोना आकडेवारी वाढतच आहे. यातच संगमनेर तालुक्यात दररोज मोठी रुग्णसंख्या आढळून येत होती.

मात्र यामध्ये आज काहीसा दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसानंतर संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या आज खालावली असून तब्बल पंधरवड्यानंतर तालुक्यातून दोन आकडी संख्येत रुग्ण समोर आले आहेत.

यापूर्वी 15 सप्टेंबररोजी आढळलेल्या 97 रुग्णांचा अपवाद वगळता संपूर्ण महिन्याभरात तीन आकडी संख्येतच रुग्ण आढळले आहेत.

आजच्या अहवालातून शहरातील रुग्णसंख्याही अवघी दहावर आली असून तालुक्यातील एकूण 86 जणांना नव्याने संक्रमण झाल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 33 हजार 99 झाली आहे. अवघ्या पाच लाख लोकसंख्येच्या संगमनेर तालुक्यातून दररोज सरासरी 151 रुग्ण या गतीने रुग्ण समोर येत गेल्याने जिल्ह्याला मात्र दिलासा मिळत नव्हता.

त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष संगमनेर तालुक्यावर खिळले होते. मात्र आज तालुक्यासह जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला असून महिन्याभरात केवळ दुसर्‍यांदा रुग्णसंख्या शंभराच्या आत आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe