अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी सोमवार दि.१७ मे पासून नगर शहरातील किराणा दुकाने,भाजी,फळे हे विकण्यास बंदी घातली आहे.
त्यामुळे सामान्य लोकांना या सर्व वस्तू जास्त पैसे देऊन घ्यावा लागत आहेत. भाजी व फळे ही जास्त पैसे देऊन घ्यावा लागत आहे.
एक तर लॉकडाऊनचा मोठा आर्थिक फटका त्यात महागाई यामध्ये सामान्य लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यात काहीजण म्हणून आपण शहरातील किराणा दुकाने, भाजी, फळे सकाळी ७ ते ११ सुरु करावे.
अशी मागणी शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांचीभेट घेवून केली आहे. याबाबत आयुक्त शंकर गोरे म्हणाले तुमची जी मागणी आहे.
त्यावर आता मी निर्णय घेऊ शकत नाही. तुम्हाला २० मे ते २२ मे पर्यंत थांबावे लागेल, कारण ही सेवा सुरू करण्याबाबत २० मे ला मुख्यमंत्री यांचे आदेशानुसार आम्ही योग्य तो निर्णय याबात घेऊ. असे सांगितले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम