अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- पदोन्नतीसाठी पात्र नसताना महापालिकेच्या नगररचना विभागातील कल्याण बल्लाळ हे गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे पदोन्नतीचा लाभ घेत आहेत.
दरम्यान बल्लाळ यांना दिलेली पदोन्नती गैर असून, त्याच्याशी संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना असतानाही महापालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असून,
त्यांच्यावर कारवाई करावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकील शेख यांनी नगरविकास मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे केली आहे. ‘ या संदर्भात पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे,
की तत्कालीन नगरपालिका असताना सबओव्हरसिअर असलेले बल्लाळ यांना कनिष्ठ अभियंता या पदावर पदोन्नती देण्यात आली. वास्तविक हे पद सरळ सेवेने ‘भज-क’साठी राखीव होते.
मात्र त्याकडे दुर्लक्ष करत व तत्कालीन नगराध्यक्ष लता वसंत लोढा, तत्कालीन मुख्यधिकारी रमेश मवासी, कामगार अधिकारी भानुदास गीते,
तत्कालीन आस्थापना प्रमुख सी. डी. सरोदे यांनी कागदपत्रात खाडाखोड करून पात्र नसताना बल्लाळ यांना पदोन्नती देण्यात आली.
दरम्यान अनेक वर्षांपासून याप्रकरणाचा पाठपुरावा केला मात्र संबंधित मनपा अधिकाऱ्यांकडून याबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेख यांनी केला आहे.
आयुक्त त्यांचे कर्तव्य पार पाडण्यात दिरंगाई करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी व बल्लाळ यांना उपअभियंता पदावरून सबओव्हरसिअर या पदावर पदावनती करावी, अशी मागणी शेख यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved