काल्याच्या कीर्तनाने शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

Published on -

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : शिर्डी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने ४ जुलैपासून सुरू झालेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता भाविकांविना सोमवारी काल्याच्या कीर्तनानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते दहीहंडी फोडून झाली.

उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे साडेचारला श्रींची काकड आरती झाली. पहाटे ५ वाजता मंगलस्नान व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती झाली. सकाळी ६ वाजता पुजारी विलास जोशी यांनी सपत्‍नीक समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा केली.

सकाळी साडेसातला पुजारी चंद्रकांत गोरकर यांनी सपत्‍नीक गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा केली. सकाळी १० वाजता पुजारी उल्‍हास वाळूंजकर

यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डाेंगरे यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. याप्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांची उपस्थिती होती, अशी माहिती देण्यात आली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News