अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या संचालिका सविता प्रकाश कोटा यांची निवड झाल्याबद्दल पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष प्रा.बाळकृष्ण सिद्दम यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक शरद क्यादर, विद्यालयाचे प्राचार्य दिपक रामदिन, भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रा.भानुदास बेरड, पर्यवेक्षीका एस.डी. रच्चा, प्रकाश कोटा, सेवक सुहास बोडखे आदी उपस्थित होते.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/03/RWS_3708-e1615792772678.jpeg)
प्रा.बाळकृष्ण सिद्दम म्हणाले की, पद्मशाली विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या सहकारी संचालिका सविता कोटा यांची भाजप महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड होणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
त्यांची कार्य करण्याची उत्तम शैली व महिला संघटन कार्याने पक्षाला याचा निश्चितच फायदा होणार आहे. त्यांचे राजकारणात कार्य करताना सर्वसामान्यांची सेवा घडण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शरद क्यादर यांनी कोटा यांना राजकारणाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|