महागाईच्या विरोधात काँग्रेसचे निदर्शने; तहसिलसमोर घोषणाबाजी

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- देशात कोरोना संकटामुळे मोठी आर्थिक तूट निर्माण झाली आहे. या संकटाच्या काळात नागरिकांचा रोजगार गेला आहे, मात्र दुसरीकडे केंद्र सरकार नागरिकांना महागाईचा चटका देत आहे.

यामुळे नागरिकांमधील रोष देखील वाढतो आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्राच्या निषेधार्थ निदर्शने केली. दरम्यान या वाढलेल्या महागाईला केंद्र सरकार जबादार असून

त्याचा पाथर्डी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तहसिल कार्यालयासमोर घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.

केंद्राने डिझेल, पेट्रोल,घरगुती गॅस खतांच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. महागाईच्या लाटेत सामान्यांपासून तर शेतकऱ्यापर्यंत सर्वजण भरडले जात आहे.

केंद्र सरकार दुहेरी आर्थिक लूट करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने लावला आहे. काँग्रेसने याबाबत नायब तहसिलदार पंकज नेवसे यांच्याकडे निवेदन सुपूर्त करण्यात आले .