अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा भारतात शिरकाव झाला आहे. यातच याचे रुग्ण राज्यात देखील आढळून आल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. नुकतेच नगर जिल्ह्यात बुधवारी आणखी 39 आंतरराष्ट्रीय प्रवासी दाखल झाले आहेत.
ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर या सर्व प्रवाशांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत 121 प्रवाशी आले असून आतापर्यंत 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 94 अहवालांची प्रतिक्षा आहे.
कोविडच्या नवीन ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्यांचा शोध घेण्यात येत असून त्यांची करोना चाचणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यात 3 तारखेला 15, 5 तारखेला 12, 7 तारखेला 55 आणि काल 39 प्रवाशी आंतरराष्ट्रीय प्रवास करून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यातील 119 प्रवाशांचा शोध लागला आहे.
त्यांचे नमुने घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान आतापर्यंत पाठविलेल्या नमुन्यापैकी 25 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 94 अहवालाची प्रतिक्षा असून दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम