संततधार पाऊस, गोदावरीत धरणांतून विसर्ग सुरू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- काेपरगाव तालुक्यात ठिकठिकाणी सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवसांत ८१.७ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद जेऊर कुंभारी हवामान केंद्रावर झाली.

दारणातून १५० क्युसेक्स पाणी सोडले, तर नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यामधून ४००, भावली धरणातून ७३, वालदेवीतून ६५, हरणबारीतून ६० क्युसेस पाणी सोडण्यात आले.

वालदेवी, भावली ही धरणे १०० टक्के, नांदूर मध्यमेश्वर बंधारा ९६ टक्के भरला. गिरणा धरणामध्ये ४० टक्के जलसाठा असल्याची माहिती पाटबंधारे खात्याच्या वतीने देण्यात आली.

पावसामुळे शहरातील रस्ते गटारी धुऊन गेल्या, तर शहरातील अनेक कार्यालयांना धाब्याच्या घरांना गळती लागली. शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर डास, मच्छर यांचा मोठा उपद्रव असल्याने आजाराचे प्रमाण वाढले आहे.

काविळ, मलेरिया, डेंग्यू आदी साथी पसरण्याचा धोका आहे. जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम अशा एकूण २४ प्रकल्पांमध्ये ५७ टक्के जलसाठा असून तो काही दिवसांपासून स्थिर आहे.

भामभावली, वालदेवी, हरणबारी, नांदूर मध्यमेश्वर ही चारही धरणे शंभर टक्के भरली. बाराहून अधिक धरणात पन्नास टक्केपेक्षा अधिक जलसाठा उपलब्ध आहे. आठ धरणाचा साठा २५ टक्क्यांहून कमी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe