भाजप मध्ये वादंग ! परवानगी न घेतल्याच्या कारणावरून ‘ते’नेते तापले…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची कार्यकारिणी करताना संमती न घेतल्यामुळे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे चांगलेच संतापले आहेत.

युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम यांनी कार्यकारिणी जाहीर करताना पूर्वपरवानगी न घेतल्याने व नियमाला धरुन नसल्याने कदम यांच्या जिल्हाध्यक्ष पदासह कार्यकारिणीच्या निवडीला मुंढे यांनी स्थगिती दिली आहे.

कदम यांनी युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करताना पक्षाच्या नियमांचे पालन केले नाही. जिल्हाध्यक्षांची संमती न घेता परस्पर यादी जाहीर केली.

त्यामुळे सदर कार्यकारिणीला स्थगिती देत असल्याचे मुंढे यांनी जाहीर केले आहे. याबाबत बोलताना अरुण मुंढे म्हणाले कि, मी भाजपाचा दक्षिण जिल्हाध्यक्ष असून या अधिकाराने युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष व युवा मोर्चा कार्यकरिणीला स्थगिती देत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment