अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे.
एकीकडे कमी होणारे कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवाळीनंतर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान नगर जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर चांगला असला तरी नागरिकांचा बेजाबदारपणा कोरोनाची आकडेवारी वाढविण्यास कारणीभूत ठरणार आहे.
नुकतेच कोपरगाव शहरासह तालुक्यात कोरोना सक्रिय झालेला दिसून येत आहे. नुकतेच कोपरगाव मध्ये २२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहे
तर बहादरपूर येथील ५२ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली. दरम्यान कोपरगाव तालुक्यात आजपर्यंत एकूण २ हजार ३८५ रुग्ण पॉझिटिव्ह झाले असून २ हजार २५२ रुग्ण बरे झाले आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved