अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे.
अशातच गुरुस्थान मंदिरात रुद्रपूजा व साईमंदिरात दहीहंडी फोडून गुरुपौर्णिमेची सांगता झाली. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम साई दरबारी जमा होणाऱ्या देणगीवरही झाला आहे.
यंदाच्या उत्सवादरम्यान साईचरणी 79 लाख 36 हजार 549 रुपये इतकी देणगी प्राप्त झाली तर मागील वर्षी याच उत्सवादरम्यान 4 कोटी 52 लाख देणगी प्राप्त झाली होती.
त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुमारे पावणे चार कोटींना फटका संस्थानला बसला आहे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था,
शिर्डीच्यावतीने यावर्षी शनिवार दि. 4 जुलै 2020 ते सोमवार दि. 6 जुलै 2020 या कालावधीत आयोजित केलेल्या श्रीगुरुपौर्णिमा उत्सवामध्ये साईंच्या झोळीत 79 लाख 36 हजार 549 रुपये इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची
माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. सदर देणगी मध्ये काउंटर 01 लाख 18 हजार 387 रुपये, डेबीट-क्रेडीट कार्ड, चेक-डी.डी.,
मनी ऑर्डर देणगीव्दारे रुपये 10 लाख 63 हजार 389 रुपये तसेच ऑनलाईन देणगीव्दारे 67 लाख 54 हजार 773 रुपये, यांचा समावेश आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews