‘त्या’ मृत अधिकार्‍याच्या पत्नीलाही कोरोना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा काल पहाटे कोरोनामुळे मृत्यू झाला.

आता त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर नगरच्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. मागील आठ दिवसापासून त्यांचावर अति दक्षता विभागात उपचार सुरु होते.

संबधित अधिकाऱ्याच्या मृत्यूने झेडपी वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांना श्रध्दांजली अर्पण केल्यानंतर मंगळवारी दिवसभरासाठी जिल्हा परिषदेचे कामकाज बंद ठेवण्यात आले.

यासह मृत अधिकारी प्रमुख असलेल्या ‘त्या’ विभागातील सर्व कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोनाची जिल्हा परिषदमधील वाढती भीती पाहता जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासह पंचायत समितीतील कर्मचार्‍यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून

या दोन ठिकाणी शिफ्टनुसार कार्यालय सुरू ठेवण्याची मागणी राज्य जिल्हा परिषद युनियनच्या नगर शाखेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस.पाटील यांच्याकडेे केली आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe