दिवसभरात ‘इतक्या’ जणांचा कोरोनाने बळी घेतला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-शुक्रवारी दिवसभरात कोरोनामुळे आणखी नऊ जणांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील बळींची संख्या ६६५ झाली आहे. दिवसभरात ७९० नवे रुग्ण आढळून आले.

जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर २६.९३ टक्के आहे. गेल्या तीन महिन्यांत रुग्णवाढीचा दर दहा टक्क्यांनी वाढला आहे. जिल्ह्याने शुक्रवारी ४० हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला.

दिवसभरात नऊ जणांचा कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे जिल्ह्यात बळींची संख्या ६६५ वर गेली आहे. बाधितांची संख्या सातत्याने वाढत असताना

नगर शहराच्या अनेक भागात आजही सकाळ-संध्याकाळ भाजीपाला खरेदीच्या नावाखाली लोक सोशल डिस्टन्सिंग बाजूला ठेवत एकत्र येत आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत शुक्रवारी १४८, खासगी प्रयोगशाळेत २२३, तर अँटीजेन चाचणीत ४१९ बाधित आढळले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment