अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक होत असून दररोज कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी भीतीदायक ठरत आहे.
सामान्यांपासून ते ज्येष्ठातांपर्यंत तर नेतेमंडळींपासून ते कोरोना योध्यांपर्यंत सर्वजण कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले आहे.
दरम्यान; जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी, असे मिळून आतापर्यंत एकूण 240 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे. यामध्ये 17 अधिकारी आहेत,
तर इतर जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात 30 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील एकाची प्रकृती चितांजनक आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत तीन पोलिसांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहे. त्यांना 50 लाख रुपयांचे विमा मिळावा यासाठी प्रस्ताव देखील पाठविले आहेत,
अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी दिली. खाजगी रुग्णालयात उपचार घेताना बिलासंदर्भात काही तक्रारी होत्या. त्यावर देखील कार्यवाही झाली.
काही रुग्णालयांच्या बिलांचे लेखापरीक्षण सुरू आहे. 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण पोलिसांना जाहीर केले आहे. त्यानुसार प्रास्ताव देखील पाठविले आहेत. त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचेही पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved