अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- कोपरगाव | शहर व उपनगरांतील नागरिकांची आरोग्य तपासणी सध्या सुरू आहे. शुक्रवारी सुमारे साडेतीन हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली.
२३ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. शनिवारी ४२ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. १८१ जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली.
१५८ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला. २९ स्राव तपासणीसाठी नगरला पाठवले आहेत. ६५ वर्षीय महिलेचा कोकमठाण येथे मृत्यू झाला, अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे डाॅ. कृष्णा फुलसौंदर यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved