अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-राहुरी तालु क्यात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाबाधित यादीत कालपर्यंत देवळाली प्रवराचे नाव आले नव्हते.
परंतु काल शेटेवाडी भागात एका वस्तीवर 36 वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आणि याठिकाणी नगरपरिषदेने तातडीने जंतुनाशकाची फवारणी करून नाकाबंदी केली आहे.
या भागातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली असून वैद्यकीय पथक संपर्कातील व्यक्तींचा शोध घेत असल्याची माहिती नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिली.
सदर रुग्ण नगरपरिषद हद्दीबाहेर असलेल्या एमआयडीसीमध्ये एका दूध प्लांटमध्ये कामाला होता. या ठिकाणी त्याचा राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथील कोरोनाबाधित असलेल्या व्यक्तीशी संपर्क आला.
त्यानंतर या व्यक्तीने नगर येथे खासगी रुग्णालयात कोरोनाची तपासणी करून घेतली. यावेळी त्यासोबत इतर 11 व्यक्ती तपासणीसाठी होत्या. त्या 11 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]