अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- कोरोनाच्या महामारीने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. अहमदनगरमध्येही रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये आता वैद्यकीय सुविधा अपुरी पडू लागल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रुग्णांना जावे लागत आहे.
परंतु या पार्श्वभूमीवर खासगी हॉस्पिटलमध्ये आर्थिक पिळवणूक केली जातेय. तेथे घोटाळे व भ्रष्टाचार होत आहेत. या आजारातून मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या अवयवाची तस्करी होत असल्याचे गंभीर प्रकार कानी पडत आहेत
असा आरोप करत कोव्हिड सेंटरमध्ये चाललेल्या कारभारावर सरकार व आरोग्य खात्याने नजर ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले.
अकोले येथे एका खासगी विवाहासाठी आले असताना पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. तेव्हा ते बोलत होते. कोरोना महामारी ही गरिबांना उध्वस्त करणारी असून
त्यामुळे राज्य देश व जगावर आर्थिक अरिष्ट कोसळले असल्याचा दावाही कवाडे यांनी केला. इलेक्ट्रॉनिक मिडीयाने करोनाच्या बातम्यांचा भडिमार सुरू करून जनतेमध्ये भीती पसरवण्याचे काम सुरू ठेवले आहे.
त्याच्या धास्तीने भीतीचे तर वातावरण आहेच. पण त्यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागल्याचा गंभीर आरोपही त्यांनी या वेळेस बोलताना केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा