अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे.
त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. श्रीरामपुरात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 189 वर जावून पोहोचला आहे.
यामुळे आता सर्वसामान्यांबरोबर प्रशासनाची चिंता वाढली आहे. काल पुन्हा नव्याने 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 15 काल 60 जणांचे रॅपीड टेस्ट घेण्यात आल्या त्यात पॉझिटिव्ह आले आहेत.
काल पॉझिटिव्ह अहवालात आलेल्या 19 जणांमध्ये सरस्वती कॉलनीतील 4 जण असून त्यात तिघे हे एकाच कुटुंबातील आहेत. वॉर्ड नं. 4 मधील दोघे जणही एकाच कुटुंबातील आहेत.
दळवी वस्ती भागातील याआधी पॉझिटिव्ह आलेला रुग्णाच्या कुटुंबातील आणखी एकजण पॉझिटिव्ह आला आहे. वडाळा महादेव येथील दोघेजण असून यापूर्वी त्यांच्याच कुटुंबातील चौघेजण पॉझिटिव्ह आले आहेत.
बेलापूर येथील प्रतिष्ठीत घरातील दोघेजण पॉझिटिव्ह आले आहेत. दत्तनगर येथील चार जण पॉझिटिव्ह आले असून यातील दोघेजण एकाच कुटुंबातील आहेत.
सराला बेटचेही दोघेही एकाच कुटुंबातील आहेत. मुळा-प्रवरा परिसरातील एकजण पॉझिटिव्ह आहे. सध्या संतलुक हॉस्पिटलमध्ये आता 60 जण उपचार घेत आहेत.
तर 20 जण हे आंबेडकर वसतिगृहात दाखल आहेत. काल 11 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात एकूण रूग्णसंख्या 3763 झाली असून 2418 रुग्ण बरे झाले आहेत. ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 1292 झाली आहे. तर 51 लोकांचा मृत्यू झाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा